एरंडोल – तळागाळातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या विकासासाठी शिक्षण हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले व यासाठी तालुक्यासह सर्वच शिक्षकांनी व पालकांनी लोकसहभागातून शाळा विकासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी तालुक्यातील भिल्लवस्ती गालापूर जि.प.प्राथमिक शाळा येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापारीनिर्वान दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन
तालुक्यातील व शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, रा.ति.काबरे विद्यालयात, महात्मा फुले विद्यालय, जिजामाता विद्यालय, ग्रामीण उन्नती विद्यालय, गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम, के.डी.पाटील इंग्लिश मेडियम, केवडीपुरा, जिल्हापरिषद शाळा व विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्था मध्ये डॉ. बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील, सहशिक्षक शेख शरीफ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने वही व पेन शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख, ग्रामविस्तार अधिकारी पवार केंद्र प्रमुख सचिन गरंडे, सखाराम सोनवणे आदी हजर होते.