ताश्कंद । भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णन (75 किलो) आणि गौरव विधूडी (56 किलो) यांनी आपआपल्या गटात चमकदार कामगिरी करताना सोमवारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच, अमित फंगलनेही (49 किलो) आपल्या गटातून आगेकूच केली. अत्यंत एकतर्फी झालेल्या लढतीत विकासने आपला जलवा दाखवताना अवघ्या 2 मिनिटांमध्ये थायलंडच्या पाथोमसाक कुटिया याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.