विकास कामांसाठी मुख्यमंत्री विशेषनिधीतुन 10 कोटी मंजूर

0

खासदार डॉ. भामरे यांची माहिती       

धुळे – शहरातील गजानन कॉलनी व इतर परिसरात विविध विकास कामांसाठी ना. डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक व कार्यकर्ते यानी महानगरामध्ये विकास कामे होण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून 10 कोटी रु. मंजूर केल असून सदरचा निधी जिल्हाधीकारी कार्यालयाकडे प्रत्यक्ष वर्ग झालेला आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येवून निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे खा. डॉ. भामरे यांनी सांगीतले. शहरातील गजानन कॉलनी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता व शांतता या हेतूने संरक्षण भिंत उभारणीची मागणीसह विविधकाम प्रस्तावित करण्यात आली आहेत.

शहरातील अशी होणार कामे
गजानन कॉलनी पुलापासून ते हमाल मापाडी परिसर पुलापर्यंत नाल्याच्या दोन्ही बाजूस संरक्षण भिंत बांधणे, प्रभाग क्र. 29 मध्ये हुडको पवननगर परिसरात रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॉक्रीट गटार बांधणे, प्रभाग क्र. 19 मध्ये 100 फुटी रस्ता डांबरीकरण, प्रभाग क्र. 35 कॉक्रीट गटार बांधणे प्रभाग क्र. 35 मध्ये स. नं. 466 मध्ये कॉक्रीट गटार, प्रभाग क्र. 32 मध्ये अग्रसेन शाळेमागे रस्ता डांबरीकरण व कॉक्रीटीकरण,प्रभाग क्र. 35 मध्ये 35 खोली परिसरात गटार बांधकाम, प्रभाग क्र. 26 मध्ये 50 खोली परिसरात कॉक्रीट गटार , प्रभाग क्र. 6 मधील क्षिरे कॉलनी मध्ये स.नं. 37 ओपन स्पेसला संरक्षण भिंत ., साक्री रोड येथील सि. नं. 79 च्या ओपन स्पेसला संरक्षण भींत व सुशोभीकरण, तिरुपती नगर येथील सि.नं. 463/1 मध्ये ओपन स्पेसला संरक्षण भीत व सुशोभीकरण, मालेगांव रोड सि. नं. 104/1 अग्रवाल नगर ओपन स्पेसला संरक्षण भीत व सुशोभीकरण,संभाप्पा कॉलनी येथील सि. नं. 569 ओपन स्पेसला संरक्षण भीत व सुशोभीकरण व वॉकिंग टॅ्रक, प्रभाग क्र. 19 जमानागिरी रोड आदिवासी स्मशानभूमी पूर्वेस संरक्षण भीत , मिल परिसर चितोड रोड येथील स्मशानभूमीस शेड आरसीसी, प्रभाग क्र. 7 सि.नं. 14/1 जयहिंद कॉलनी मध्ये ओपन स्पेसला संरक्षण भीत व सुशोभीकरण ,प्रभाग क्र. 7 सि नं. 31/2 प्रोफेसर कॉलनी मध्ये ओपन स्पेसला संरक्षण भीत व सुशोभीकरण, .देवपूर मयूर शाळेसमोरील ओपन स्पेसला पेव्हर ब्लॉक, कॉक्रेट बेंच व सुशोभीकरण, देवपूर येथील सि. नं. 39 येथे ओपन स्पेसला पेव्हर ब्लॉक,कॉक्रेट बेंच व सुशोभीकरण, प्रभाग क्र. राउळवाडी येथे रस्ता डांबरीकरण, प्रभाग क्र. 14 परसारातील अकबर चौक, मनोहर थियेटर ते गांधी पुतळा, घड्याळवाली मस्जिद परिसर, माधवपुरा, पालाबाजार ते लालबाग व गल्ली नं. 2 इ. भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ही सर्व कामे धुळे महानगर पालिकेच्या वैभवात भर घालणारी आहे व शहरातील सर्व प्रभागांच्याही कामांचे नियोजन सर्व सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी करण्यात येत आहे. या सर्व कामांसाठी मा. मुख्यमंत्री यांनी ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन निधी मंजूर करून उपलब्धही करून दिला आहे.