अमळनेर: तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्र आ.च्या सरपंचपदी कल्पना अंबालाल पाटील व उपसरपंच जयश्री दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. गावातील विकास कामांमुळेच पुन्हा एकदा सत्ता दिली असल्याचे नवनियुक्त सरपंचांनी सांगितले. यासाठी माजी सरपंच अर्जुन पाटील, गोरख गोपीचंद पाटील, श्रीराम महादू पाटील, संभाजी शिवदास पाटील,राकेश गोकुल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेल्या पॅनलने बहुमत मिळविले.