विकास कामे दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील

0

आळेफाटा । राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विविध विकासकामे चांगली पारदर्शक व दर्जेदार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले.

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रभाग समिती सभा पांडुरंग पवार यांच्या अध्यक्षेखाली नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी सतीश गाढवे, विस्तार अधिकारी जयश्री बेनके, तालुका आरोग्य अधिकारी श्याम बनकर, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, सारिका औटी, राजकुमार मुके आदींसह जिल्हाभरातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शासकीय विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेमध्ये बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व परिसर स्वच्छता, जलसंधारण व छोटे पाटबंधारे, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, पूर्व प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत, वन, महसूल, पाटबंधारे, महावितरण अशा चौदा विभागाच्या कामांचा आढावा घेऊन अपुरी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. तसेच नवीन कामांचे नियोजन करण्यात आले.