मुंबई । कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने साजर्या करणार्या कबड्डी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे देण्यात येणार्या विविध पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये पुण्याचा अष्टपैलू खेळाडू विकास काळेला मधुसुदन पाटील पुरस्कार तर मुंबई उपनगरच्या कोमल देवकरला अरुणा साटम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय सवोत्तम संघटनेचा पुरस्कार यावेळी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला देण्यात येणार आहे. नाशिक मध्ये 15 जुलै रोजी होणार्या कबड्डी दिनाच्या. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख अजित पवार उपस्थित राहणार आहेत.