विकास तुपविक्री केंद्रात चोरी

0

विसनजीनगरातील केंद्राच्या मुख्य दरवाजाचे तीन कुलुपे व कडीकोयंडा तोडून प्रवेश

अडीच हजाराचे चिल्लर चोरट्यांनी केली लंपास

जळगाव । शहरातील विसनजी नगरातील विकासचे तुप विक्री केंद्र फोडून चोरट्यांनी जवळपास अडीच हजार रुपयाची चिल्लर चोरून नेल्याची घटना रविवारी १० रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात दुपारपर्रत कुठलीही नोंद नव्हती. विसजनी नगरातील स्वीट मार्ट शेजारी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था मर्यादीत विकासचे तुप विक्री केंद्र आहे. ९ रोजी रात्री ७ वाजता केंद्राचे प्रमुख प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्‍रांनी बंद केले. मध्यरात्री चोरट्यांनी या केंद्राच्या मुख्य दरवाजाला लावलेले तीन कुलुप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी काऊंटरच्या ड्राव्हरमधील १० रुपयांच्या नोटाचे १ बंडल, ५ व १० रुपयांचे नाणे असा जवळपास अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेला.

डीबी पथक घटनास्थळी
सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारील फुल विके्रते गोपाळ बारी व सहकार्‍रांना विकासच्या दुध विक्री केंद्रात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ जवळ असलेल्या विकासच्या मुख्य वितरण कार्यालयाला व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती कळताच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पीएसआय वाघमारे यांच्यासह डीबी पथकातील कर्मचार्‍रांनी घटनास्थळी भेट दिली.

कुलुप तोडून फेकले
तुप विक्री केंद्राच्या मुख्य दरवाज्याला चार मजबुत कुलुप लावण्यात आले होते. चोरटयांनी टॉमीच्या साहाय्याने चारही कुलुप तोडले. चारही कुलुप चोरटयांनी शेजारील दुकानाच्या जिन्यावर फेकुन दिले होते. पीएसआय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जवळच असलेल्या स्वीटमार्टच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ताब्यात घेवून पाहणी केली. दरम्यान फुटेजमध्ये काहीही मिळून आले नसल्याचे समजते.