कानपूर:आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे आज शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून आता चर्चा सुरु झाली आहे. राजकारण देखील होत आहे. दरम्यान विकास दुबेचा एन्काऊंटर नव्हे तर खून झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटरवर शंका घेण्यात आली आहे. गाडी ज्या वेगात होती, त्या वेगात जर ती पलटी झाली असती तर मोठे नुकसान झाले असते. मात्र गाडीचे केवळ काच फुटले आहे. विकास दुबेने पळ काढल्याचे बोलले जात आहे, पळ काढली असती तर पोलीस आणि त्याच्यात झटापट झाली असती. पाऊस झालेला असल्याने पोलिसांच्या कपड्यांवर कोठेही चिखल वगैरे दिसत नाही? आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.