विकास प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या ८८१ वृक्षांची कत्तल केली जाणार

0

कल्याण :- कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील मध्ये रेल्वेच्या कल्याण, टिटवाळा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी तसेच डेडीकेटेड फ्रेड काँरिडाँर उपक्रमांतर्गत पनवेल वसई रेल्वे मार्गावर समांतर जड वाहतूक सेक्सनिंग प्रकल्प उभारण्याच्या विकास कामासाठी बाधा ठरणाऱ्या ८८१ झाडांचा अडसर दूर करण्यासाठी या झाडांची वृक्षतोड करण्यासाठी पालिकेच्या वृक्षप्राधीकरण समिती कडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे विकास प्रकल्पासाठी ८८१ वृक्षांची कत्तल केली जाणार आहे.

डेडीकेटेड फ्रेड काँरिडाँर उपक्रमांतर्गत पनवेल वसई रेल्वे मार्गावर समांतर जड वाहतूक सेक्सनिंग प्रकल्पा साठी पालिका क्षेत्रातील वडवली व घेसर (४३) निळ्जे (१०४) नांदिवली (१२०)आयरे (२०९) गावातील तर मध्य रेल्वेच्या कल्याण ,टिटवाळा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी (२८०)ठाकुर्ली (११३) अशी ८८१ झाडांचा अडसर येत आहे हि झाडे तोडण्याची गरज असून त्यापोटी रेल्वे प्रशासना कडून १ कोटी २६ लाख रुपये महापालिकेला अनामत रक्कम भरणा केला जाणार आहे .या वर्कश तोडीने ४२२० झाडे नव्याने लावण्याचा येणार आहेत.महापालिकेच्या डोंबिवली परिसरातील जोशी हायस्कूल पर्यंतच्या उड्डाण पुलाच्या (फ्लाय ओव्हर )पोहच रस्त्याला अडसर झाडे हि तोडण्यात येणार आहेत अद्यापर्यंत वर्कश प्राधिकरण समितीने १२७ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे पालिकेने २००७ साली केलेल्या वृक्षगणने नुसार २ लाख ४५ हजार वृक्षांची नोदणी करण्यात आलेली आहे यंदा नव्याने वृक्ष गणना केली जाणार असून प्रत्येक झाडाच्या गणने साठी २० ते २५ रुपया खर्च येणार असल्याने सुमारे पालिका क्षेत्रातील सव वृक्षाच्या गणनेसाठी दीड कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज जात असून पालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाज पत्रकात या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हि नोदणी संगणक प्रणालीच्या माध्यमातून होणार असून जी.पी.एस. व जे.पी.आर.एस.प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे .