शेंदुर्णी । पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील विकास विद्यालयाचा दहावीचा निकाल 84.21 टक्के लागला असून 38 पैकी 32 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यालयातुन आरती शंकर सुतार हीने 76 टक्के गुण मिळवत प्रथम, प्रतिभा नेटके 75.60 द्वितीय, पुजा समाधान गायकवाड हीने 75.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.