मनोर । कुणबी समाजोन्नती संघ सलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित कुणबी युवा परिषदेचे आयोजन विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथे 16 व 17 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. कुणबी समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणे, घटनात्मक अधिकारांची जागृती, ओबीसी आरक्षण, कुणबी युवा शक्तीचे सशक्तिकरण तसेच पेसा कायद्याचा कुणबी समाजातील शिक्षित तरुणाईवर झालेला दुरोगामी परिणाम, लोकभाषा-संस्कृतीचे जतन, या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन परिषदेत कअरूयात आले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ओंदे येथे ही परिषद होणार आहे. या युवा परिषदमधे मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नागपुर, भंडारा, चंद्रपूर, जिल्हातील कुणबी युवक सहभाग घेनार असल्याचे आयोजकानी सांगितले.
16 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या परिषदेची सभासद नोंदणी फी 250 रुपये आहे. परिषदेला येनार्या सभासदांची चहा, नाष्टा, जेवण व राहण्याची सर्व वेवस्था ही विक्रमगड तालुका कुणबी समाजाकडून करण्यात आली आहे. या परिषदेसाठी येणार्या सर्व कार्यकर्ते, समाज बांधव व युवकांनी आपली नाव नोंदणी पालघर जिल्ह्यातील शिवा सांबरे- 9270408333, अमोल सांबरे- 9270266696, यांच्याकडे आपली नोंदणी करून कार्यक्रमाला सहकार्य करावे अशी विनंती आयोजकंकडून करण्यात आली आहे.