विक्रांतसिंह रावल यांचा उत्कृष्ट गो-पालक म्हणून सन्मान

0

दोंडाईचा । येथील दादासाहेब रावल शिंदखेडा तालुका दुध संघाचे अध्यक्ष ‘गोपालरत्न विक्रांतसिंह रावल’ यांचा भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते उत्कृष्ठ गोपालक म्हणुन सत्कार करण्यात आला. मुंबई येथील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे “गौरवशाली भारतीय गाय’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतीक राष्ट्रवादाचे कारण प्रसारीत करण्यासाठी काम करणारी संस्था ‘विराट हिंदुस्तान संगम यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी डॉ.सुब्रमण्यम स्वामी, केंन्द्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर, गोपाल सुतारीया, ऋषीकेश मफतलाल हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्वरांच्या हस्ते देश-विदेश व राज्यातील शेतकरी, गो-पालक, संशोधक,ब्रिडर्स यांचा सत्कार करण्यात आला.

विक्रांतसिंह रावल यांचा महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट गो-पालक म्हणुन डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेत कोअर कनेक्ट्र अ‍ॅप्स नावाची एक नविन अ‍ॅप्लीकेशन सुरू करण्यात आले. आणि कॅपिटलिझम,कम्युनिझम अ‍ॅण्ड कंझिमम नावाची पुस्तके डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.