जळगाव : दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विक्रांत पाटील यांचे वडील विश्वनाथ धोंडू पाटील यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. दिवंगत विश्वनाथ पाटील हे वसंत सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त अभियंते होते.
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कासोदा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , वैद्यकीय, कायदा, व्यापार-उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह समाजातील सर्व स्तरांतील स्नेहीजन त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी दैनिक जनशक्ति परिवारातर्फे दैनिक जनशक्तिचे संपादक शेखर पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केेले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.