विक्रीकर रिटर्न भरण्याची मुदत 15 जूनपर्यंत वाढली

0

जळगाव । जिल्हा व्यापारी महामंडळ व जळगाव कर सल्लागार संघटनेने ऑनलाईन रिटर्न भरण्याविषयी केलेल्या तक्रारींची दखल आज विक्रीकर आयुक्तांनी घेतली. त्यानंतर दुपारी ऑनलाईन व्यापारी महामंडळ व कर सल्लागार संघटनांच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा केली. सध्या ऑनलाईन रिटर्न भरण्यासाठी यंत्रणेत अडचणी येत असल्याची दखल घेवून दंडाची आकारणी करणार नाही आणि विक्री कर संदर्भातील रिटर्न भरण्याची मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्यात आले असल्याची माहिती व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सरचिटणीस व फामचे उपाध्यक्ष ललीत बरडीया, प्रदीप खिंवसर, दिलीप झाबक यांनी दिली.