विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक

2

दोंडाईचा। पै सा कमविण्यासाठी माणुस काय काय करू शकतो याचा नेम नाही. प्रसंगी पैसे कमविण्याच्या लालसेपोटी निरापराध जीवांशी देखील तो खेळ करतो. याचा प्रत्यय दोंडाईचा येथील नागरिकांना आला आहे. हरतालिका पुजा तसेच गणेश चतुर्थी निमित्त सलग दोन दिवस उपवास असल्याने बाजारात केळीसह इतर फळांना मोठी मागणी आहे. याचाच फायदा घेत शहरातील बहुतांश व्यापार्‍यांनी कार्पेट नावाचे केमिकल टाकुन कृत्रीमरित्या अर्धवट पिकविलेल्या केळींची विक्री होत आहे. बाजारपेठेत फळांची मागणी अधिक असल्याने व्यापारी मात्र अर्धवट पिकविलेल्या फळाच्या माध्यमातून चांगली कमाई करुन घेत आहे. परंतु कृत्रीमरित्या पिकविलेल्या फळापासून नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो याचा विसर व्यापारांना पडला आहे.

ग्राहकांशी विश्‍वास घात
दोंडाईचा शहर जरी तालुक्याचे गाव नसले आजुबाजुच्या गावांतील जनतेचा दोंडाईच्याशीच संपर्क असतो. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील जनता खरेदीसाठी दोंडाईचा बाजाराला पसंती देते. अगदी लग्नाचा बस्ता पासुन तर सोने खरेदी करण्यासाठी धुळे नंदुरबार दोन्ही जिल्हातुन लोक दोंडाईचा शहरात येतात. दोंडाईचा मोठे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नागरिकांचा विश्‍वास बसला आहे. मात्र व्यापार्‍यांच्या कृतीमुळे ग्राहकांच्या विश्‍वासाला तडा गेला आहे.

अधिक दराने विक्री
वस्तुवरील मुळ किंमतीपेक्षा अधिक दराने व्यापार्‍यांकडून वस्तुंची विक्री होत आहे. सुटे पैसे परत न देता अधिक दराने वस्तुंची विक्री केली जात आहे. उपवासाला केळी किंवा राजगिर्‍याचा लाडू खातात. त्यामुळे या वस्तुंना विशेष मागणी आहे. या मागणीचा फायदा घेत व्यापार्‍यांनी दर वाढविले आहे. तक्रार करणार्‍यांनाच दम भरण्याचा प्रकार व्यापारी करीत होता. ग्राहकांना चढ्या भावाने विक्री केली. अनेकांचे विक्रेत्यांशी वाद होतानां बाजारात दिसुन आले.

ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी
मोठ्या शहरात अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातुन ग्राहकांना जागृत केले जाते. म्हणुन मोठ्या शहरात ग्राहकांची लुट होत नाही. मात्र ग्रामीण भागात ग्राहकांना ग्राहक कायद्यांची माहिती नसल्याने चालाक व्यापारी त्यांची सहज लुट करून घेतात त्यांना एम.आर.पी.पेक्षा अधिक किमंत देवुन मुदत संपलेला माल देतात तर कधी नामांकित कंपनीचा बनावट माल विक्री करून सहज फसवितात फसवणुक होवुन देखील कायदे व अधिकार माहित नसल्याने अनेक ग्राहक निमुटपणे सहन करतात तेव्हा ग्राहक मंचच्या वतीने ग्रामीण भागात ग्राहक जनजागृती चळवळ उभी रहावी अशी मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.