जळगाव। शहरात गणेशोत्सवानिमित्त गणेश मुर्ती, पुजा साहित्य व सजावटीचे साहित्य विक्री करण्यासाठी दोन दिवसांसाठी स्टॉल लावण्याची विक्रेत्यांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात आकाशवाणी चौक ते बहिणाबाई चौक व टावर चौक ते शनी पेठ पोलीस स्टेशन येथे या विक्रेत्यांना जागा देण्यात आली होती. काल गणेशाची स्थापना झाल्यानंतर हा बाजार संपला आहे.
तीन तास चालली स्वच्छता मोहीम
गणेशोत्सवाचा बाजार संपल्यानंतर त्याठिकाणी कचरा पडून होता. याची स्वच्छता करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आरोग्य अधिकार्यांना दिले होते. यानुसार सकाळी सात वाजता बहिणाबाई चौकात आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उपमहापौर ललित कोल्हे, मावळते महापौर नितीन लढ्ढा हजर झाले होते. त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, रोटरी वेस्ट, मोरया ग्रृपचे सदस्य, आरोग्य निरीक्षक देखील उपस्थित होते.विके्रते दुर्वा, फुले, फुल माळा हे जागेवरच सोडून गेल्याने मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला होता. हा कचरा आरोग्य विभागाचे कर्मचार्यांनी उचलला. हा कचरा उचलतांना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी तसेच माजी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी देखील हातभार लावला. ही स्वच्छता मोहिन तीन तास चालली. यात 10 टन कचरा उचलण्यात आला. हा कचरा वाहून नेण्यासाठी 8 टॅक्टर, 4 घंटागाड्या, 1 कॉम्पॅक्टर यांचा उपयोग करण्यात आला. सकाळी 7 ते 10 चाललेल्या स्वच्छता मोहिमेने परिसर चकाकत झाला आहे.
यावेळी जळगाव मनपा प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, रोटरी क्ल्ब जळगाव वेस्टचे अध्यक्ष गोविंद मंत्री, सचिव मनिष पात्रीकर, ललित कोल्हे, शिरीष बर्वे, डॉ. पी.एम. भंगाळै, डॉ. निरज अग्रवाल, डॉ. जगमोहन छाबडा, राजीव बियाणी, प्रितेश चोरडीया, शरद जोशी, निमित कोठारी, सागर मुंदडा, डॉ. जितेंद्र कोल्हे, योगेश व्यास, तसेच मनपा अधिकारी विकास पाटील, व इतर अधिकावरी तसेच नगरसेवक यांनी मोठ्या संख्येने स्वच्छता अभियाना सहभाग नोंदविला होता.