विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, धारणीचा आरोपी जाळ्यात

0

भुसावळ। रेल्वेत खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या विक्रेत्यासह प्लॅस्टीक कचरा गोळा करणार्‍या इसमात 20 जून रोजी हाणामारी होवून चाकू मारल्याने एक जण गंभीर झाल्याची घटना घडली होती.

जखमीने दिलेल्या वर्णनावरुन लोहमार्ग पोलिसांनी आरोपीचा छडा लावला असून धारणी येथील इसमास अटक करण्यात आली आहे. अर्जून उर्फ श्रावण धिसुलाल काजदेकर (24, धारणी, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 20 जून रोजी अर्जून व खाद्यपदार्थ विक्रेता रोहित नर्मदा तिवारी (18, ललितपुर, उत्तरप्रदेश) यांच्यात आऊटरवर कुठल्यातरी कारणावरुन हाणामारी झाल्याने आरोपी अर्जुनने रोहितच्या पोटात चाकू मारल्याने त्यास गंभीर दुखापत झाली होती. जळगाव सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

जखमीने दिलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी आरोपीस पकडले. लोहमार्गचे प्रभारी पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजीत तडवी, जगदीश ठाकूर, जय कोळी, विजय शेगावकर यांनी कारवाई केली.