विक्रोलीयन्स संघाने पटकावला जंबो चषक

0

नेरुळ । चेंबूर घाटला गाव गावदेवी क्रीडांगणावर झालेल्या जंबो चषकावर विक्रोळी येथील विक्रोलीयन्स संघाने मोहोर उमटवली. द्वितीय क्रमांक श्रेया इलेव्हन य संघाने पटकावला. दि. 23 व 24 डिसेंबर रोजी ही स्पर्धा संपन्न झाली. यात मुंबई, नवी मुंबई व ठाणे व रायगडच्या 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण हे यु ट्यूबद्वारे करण्यात आले होते. प्रथम क्रमांक मिळणार्‍या संघाला तब्बल 50 हजार रुपये तर द्वितीय क्रमांक मिळवणार्‍या संघाला 25 हजार रुपये रोख परितोषिक देण्यात आले. यात प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह देण्यात आले तर प्रत्येक सामन्यातील सामनावीर खेळाडूला टीशर्ट पारितोषिक स्वरूपात देण्यात आले.

अंतिम सामन्यातून उत्कृष्ट गोलंदाज विक्रोलीयन्स संघाच्या राहुल रॉय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विक्रोलीयन्स संघाच्या लकी सिंघ व मालिकावीर म्हणून विक्रोलीयन्स संघाच्या निशांत शिवलकर यांची निवड करण्यात आली या सर्व खेळाडुंना आकर्षक चषक पारितोषिक म्हणून देण्यात आला.