धुळे । जिल्हरातील शिंदखेडा तालुक्यात महाजकोच्या वतीने निर्माण केल्या जाणार्या सौर उर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्रा जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालरात विष प्राशन केलेल्रा वयोवृध्द शेतकरी धर्मा मांगा पाटील यांचे काल रविवारी रात्री 11.30 वाजता मुंबईतील जे. जे. रुग्णालरात मृत्रू झाला. धुळे जिल्ह्यातील शेतकर्याच्या या मृत्युने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे, त्याचे पडसाद आता राजधानी मुंबई पासून धुळे जिल्ह्यातील विखरण गावापर्यत उमटू लागले आहे. मयत शेतकर्याच्या मुलाने जे.जे. रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून विखरणच्या शेतकर्यांनी गावाबाहरे रास्तारोको केला. तर राज्य सरकारचीही आता धावपळ सुरु झाली आहे. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वर्तुळातही कारवाईच्या भितीने खळबळ उडाली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी धर्मा मंगा पाटील (वय80) यांनी 22 जानेवारीला मुंबई येथे मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती त्याच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र काल रविवारी रात्री 1.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचे समाजमन हादरुन गेले असून संपुर्ण धुळे जिल्ह्यात आणि राज्यांत या घटनेवर तिव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. आत्महत्रा केलेल्रा वडिलांना रोग्र न्रार मिळेपर्रंत मृतदेह रुग्णालरातून हलवणार नाही, अशी भूमिका धर्मा रांचे पुत्र नरेंद्र पाटील रांनी घेतली आहे.
धर्मा पाटील रांच्रा मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्रात आले आहे. मात्र, पाटील रांच्रा कुटुंबिरांनी मृतदेह ताब्रात घेणार नाही असा पवित्रा घेत जे.जे. रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. तर इकडे धर्मा पाटील रांच्रा मृत्रूची बातमी कळताच शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्रा गावकर्रांनी आज सकाळी 10 वाजेपासून दोंडाई-धुळे रस्त्रावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. गावातील अनेक शेतकरी, तरुण यांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आपला राग व्रक्त करण्रास सुरूवात केली आहे.