धुळे – शिदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नंदुरबार दौर्यावर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांनी पाटील यांच्या कुटुंबीयांची शनिवारी सकाळी 10 वाजता भेट घेतली. त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांना दिले. यावेळी माजी मंत्री बाळसाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली. पाच एकरच्या बदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाजया यंत्रणेने त्यांना देऊ केला. मात्र, हा मोबदला योग्य नाही. वीज प्रकल्पासाठी जमीन संपादीत करणार्या यंत्रणेकडून दुजाभाव केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत पाठपुरावा करून थकलेले विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात सोमवार (22 रोजी) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.