मंत्रिमंडळ विस्तार: विखे पाटील, क्षीरसागर, महातेकर यांना कोर्टाचा दिलासा !

0

मुंबई: कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना विखे पाटील, क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांचे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आले. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका फेटाळण्यात आली आहे. सुरिंदर अरोरा, संजय काळे, संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती.

न्या.एम.सी.धर्माधिकारी आणि न्या.गौतम पटेल यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील निकालाचे वाचन केले. हे घटनाविरोधी निवड असून त्यांना अपात्र ठरवावे अशी याचिका दाखल करण्यात आली होती.