विखे-पाटील ठगांच्या गॅंगमध्ये कसे सहभागी झाले?; अजित पवारांचा टोला

0

मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विखे-पाटील आणि भाजप सरकारवर कोटी केली. चार महिन्यापूर्वी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारवर टीका करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विखे पाटील ठग म्हणत होते, मात्र चार महिन्यात काय इतका बदल झाला की विखे पाटील ठगांच्या गॅंगमध्ये सहभागी होऊन मंत्री झाले? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून सभागृहात एकच हशा पिकला.

बीडचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. कधीही त्यांनी शिवसेनेसाठी परिश्रम घेतले, नाही अशा लोकांना मंत्रीपद देण्यात आले. कट्टर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना काहीही मिळाले नाही, बाहेरून आयात करून भाजप-सेनेने मंत्री बनविले असा टोला अजित पवार यांनी लगावला.

विखे-पाटील हे वारंवार सरकारवर टीका करत होते, म्हणून त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे का? असा प्रश्नही अजित पवार यांनी केला.