शिर्डी । गुणवत्ता व पर्यावरण संवर्धनाच्या जोरावर पुणे शहरातील ‘विखे पाटील मेमोरियल स्कूलला ‘ ग्लोबल ग्रीन स्कूल स्टुअर्डशीप’ या पुरस्काराने शुक्रवारी अमेरिकेत गौरविण्यात आले.हा सोहळा शुक्रवारी न्यूयार्क मध्ये झाला. परदेशात सन्मानित होणारी पुणे शहरातील ही एकमेव शाळा आहे.न्यूयार्क स्थित ग्रीन स्कूल संस्था अमेरिका,भारत, अरब अमिराती या देशातील शाळांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. ‘पर्यावरणसंबंधी प्रात्यक्षीकाद्वारे जागरूकता’ अशी मोहीम राबविण्यास शाळांना प्रोत्साहित करते. वर्षभराची कामगिरी तपासून ‘ ग्लोबल ग्रीन स्कूल स्टुअर्डशीप अवार्ड साठी निवड करतात.
मुख्याध्यपिका सौ मृणालिनी भोसले ,सायन्स शाखेच्या शिक्षिका सौ निधी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आले. चेअरमन डॉ अशोक विखे पाटील म्हणाले, मुलांचे ज्ञान ,व्यक्तिमत्व विकास हा शाळेतल्या वर्गापेक्षा बाहेर घडत असतो.विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना के.जी.च्या वर्गापासूनच शिक्षण,ज्ञान यांचेशी निगडीत 50 प्रकारचे विविध उपक्रम राबवून एकात्मिक विकासावर प्रामुख्याने फोकस केला जातो. परीक्षा व होमवर्क यावर कमी भर दिला जातो. या वेगळेपणामुळेच येथे शिकलेले बहुसंख्य विद्यार्थी जगभर स्थिरावली आहेत.