विचित्र अपघातात अ‍ॅपेसह तीन वाहनांचे नुकसान

0

भुसावळ । जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीवर अ‍ॅपे रिक्षाला दुसरी रीक्षा ओव्हरटेक करीत असताना कट लागून झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वारही पडल्याने तीन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार, 12 रोजी सकाळी घडली.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रारदारांनी माहिती दिली असलीतरी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूषण मनोहर चौधरी व मनोहर हरी चौधरी दुचाकी (क्र.एम.एच.19 सी.एच. 5006) ने जात असताना अतीश लवंगे यांची अ‍ॅपे रिक्षा (क्र.एम.एच.28 आर.2552) व हसन अली युसूफ अली यांच्या रीक्षा (क्र.एच.एच.19 ए.आर.7121) मध्ये विचित्र अपघात होवून दुचाकीस्वार जखमी झाला.