चोपडा। शासनाने विजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. शेतकरी अगोदरच संकटात सापडला असून विजदरवाढीमुळे अधिकच कंबरडे मोडले जाणार आहे. शासनाने दुष्काळात विज बिल माफीच्या घोषणा केल्या मात्र विज माफी देण्यात आली नाही. गुजरात व राजस्थानपेक्षा पाच पट अधिक विजदर वाढ करण्यात आली आहे.
दरवाढ रद्द करावी अशी मागणी चोपडा शेतकरी कृती समितीने केले आहे. जेडीसीसी बँकेकडे असलेल्या जुना नोटा शासनाने जमा केल्या नाही. त्यातच रुपी कार्डच्या माध्यमातू व्यवहार करणे बंधनकारक करण्यात येत असल्याने शेतकर्यांसाठी ते नुकसान कारक ठरणार आहे. शेतकर्यांना नियमित कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी समिती सदस्य एम.के.सोनवणे, प्रकाश पाटील, अशोक सांळुखे, अॅड.एस.डी.पाटील, अॅड.सुभाष देसाई, गिरीष पाटील, भैय्यासाहेब बाविस्कर आदींनी केली आहे.