विजबिले दुरुस्त न केल्यास आंदोलन

0

मुक्ताईनगर। वीज वितरण कंपनीमार्फत कंपनीकडून वीज मिटर रिडींग कंत्राटदारांकडून मागील एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांची रिडींग विहित वेळेत न घेतल्यामुळे वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहेत. ती अत्यंत अन्यायकारक असून वीज ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने वीज ग्राहक सदरील बिले भरण्यास तयार नाही.

ग्राहकांमध्ये संतापाची लाट

वीज मिटर रिडींगसाठी नेमलेल्या कंत्रदाटदार व त्यांचे कर्मचारी हे वेळोवेळी रिडींग घेत नाही व अंदाजे रिडींग घेवून प्रचंड बिले दिले जातात. त्यामुळे ग्राहक सदरील बिले भरण्याच्या मनस्थितीत नसून वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. या सदरील अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे वीज बिलांची होळी करण्यात येईल.

बिलात सुधारणा करा
तसेच बेजबाबदार कंत्राटदाराचे कंत्राट रद्द न केल्यास आंदोलन करण्यात येईल. वरील प्रमाणे समस्या या विज वितरण कंपनीचे दुर्लक्ष व कंत्राटदाराचे बेजबाबदारपणा कारणीभुत असून येत्या दोन ते तीन दिवसात सुधारणा न झाल्यास येत्या 2-3 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.