पुणे : १ जानेवारीला दरवर्षी कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांसाठी राज्य सरकारने यंदा टोलमाफी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे देशभरातून लाखो अनुयायी गाड्या घेऊन येत असतात. त्यांच्यासाठी टोलमाफी करण्यात आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर टोलमाफी करण्यात आली आहे. आरपीआयच्या शिष्टमंडळाने टोलमाफीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.