विजयानगरच्या वैभवशाली दुनियेचे यथार्थ दर्शन

0

पिंपरी-चिंचवड । उत्तम निरीक्षण करणारा उत्तम छायाचित्रण करू शकतो. उत्तम निरीक्षणाद्वारे प्रत्येक क्लिक मधून विजयानगरच्या वैभवशाली दुनियेचे यथार्थ दर्शन देवदत्त कशाळीकर यांनी घडविले आहे, असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ींहश श्रेीीं शाळिीश या छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

चिंचवड येथील पु. ना. गाडगीळ कलादालनामध्ये हंपीमधील छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी जागतिक किर्तीचे चित्रकार रवी परांजपे, खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, अजित गाडगीळ आदी उपस्थित होते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रकार रवी परांजपे म्हणाले की, जगाच्या कानाकोपर्‍यामध्ये भारतीय शिल्पकला व इतिहास पोहोचविण्याचे काम देवदत्त कशाळीकर यांनी केले आहे. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार नाना शिवले यांनी मानले.