विजया संगीत विद्यालयाची गुरुपौर्णिमा

0

किन्हवली : वांगणी येथील विजया संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा समारोह संत गजानन महाराज सभागृहात संपन्न झाला. विजया संगीत विद्यालयाचे संस्थापक व संगीत शिक्षक गणेश जाईल व तबला प्रशिक्षक गिरीश जाईल यांचे विद्यार्थ्यांनी पूजन करून समारोहास सुरुवात झाली. या प्रसंगी संगीत विद्यालयाच्या आजी, माजी संगीत विशारद विद्यार्थ्यांनी राग-बंदिश, भजने, तबला वादन अशा कला सादर केल्या. विद्यालयाचे संस्थापक व संगीत शिक्षक गणेश जाईल व तबला प्रशिक्षक गिरीश जाईल यांच्या जुगलबंदीने समारोहास रंगत आणली. प्रमोद मस्तूद यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गंगाराम ढमके तसेच संजय प्रधान आदींनी मेहनत घेतली.