विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

0

भुसावळ। देशाचा 70वा स्वातंत्र्यदिन शहरातील शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्था व संघटनांतर्फे ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला तर पंचायत समितीतर्फे शहरात जनजागृती रॅली काढण्यात येऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शासकीय ध्वजारोहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मी मकासरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोरे यांसह अधिकारी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

नगरपालिका कार्यालय
नगरपालिका आवारात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत होवून उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली, पाणी पुरवठा सभापती किरण कोलते, नगरसेवक पिंटू कोठारी, संतोष त्र्यंबक चौधरी, प्रमोद नेमाडे, प्रा. सुनिल नेवे, महेंद्रसिंग ठाकूर, प्रा. दिनेश राठी, मुकेश गुंजाळ, बोधराज चौधरी, मेघा वाणी, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, रविंद्र सपकाळे, वसंत पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, आरोग्य अधिकारी दारा फालक, देवेंद्र वाणी, माजी नगरसेवक साबीर शेख, शिवसेनेचे उमाकांत शर्मा, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, ज्येष्ठ धावपटू आर.बी.भंवार यांसह पालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

रेल्वे डीआरएम कार्यालयात डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरपीएफने परेड सादर केली.

वाघोदा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम
वाघोदा येथील शांती विद्या मंदिर तसेच स्वामीनारायण गुरुकुल येथे देखील ध्वजारोहण झाले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शहरातील विविध भागात देखील कार्यक्रम झाले अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लहान मुलांना खाऊ वाटपदेखील झाले.

उसामा उर्दू हायस्कूल
उसामा उर्दू हायस्कूलमध्ये मायनोरेटी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उसामा खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर हाजी मो.ताहेर खान यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, नाट्य, मुशायरा आदी कार्यक्रम सादर केले. सुत्रसंचालन मो. जफर यांनी केले. प्रास्ताविक शेख इब्राहिम यांनी केले. यावेळी उसामा खान, रुकया खान, हाजी ताहेर खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी एजाज खान, सलाउद्दीन अदीब, जीशान सैय्यद आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नासिर हुसेन, शेख यामिन, शेख रफिक, मोहम्मद जफर, शकिल अहमद, शेख मुसा आदींनी परिश्रम घेतले.

दावते इस्लामीतर्फे स्वतंत्रता रॅली
दावते इस्लामीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त कांजूल इमान चौक ते अन्सार उल्लाह नगर ते रजा टॉवर ते आंबेडकर चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी घोषणा दिल्याने संपुर्ण परिसर दणाणून निघाला. सलीम अत्तारी, जुबेर अत्तारी, शेख अजहर, युसूफ खान आदी उपस्थित होते. रॅली कांजूल इमान मस्जिदच्या परिसरात संपन्न झाली. शेवटी सलीम अत्तारी यांच्यामार्फत देशाची उन्नती एकात्मता व शांसतीसाठी प्रार्थना करण्यात आली.तसेच देशभक्तीपर व्याख्यान देण्यात आले.

सुशिलाबाई चौधरी विद्यालय
शहरातील वांजोळा रोड परिसरातील स्व. छबिलदास काळू चौधरी बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुशिलाबाई चौधरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे संचालक हिंमत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी मुख्याध्यापिका आशा पाटील, पंकज कुरकुरे, कैलास तांबट, सुनिल चौधरी, प्रविण चवरे, सोनाली वायकोळे, प्रशांत गाढे, रोशन पाटील, अमोल हिरे, सचिन नेमाडे, लिपीक निलेश पैठणकर, निलेश चौधरी आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शहीद स्मारक, सावदा
शहीद अब्दुल हमीद स्मारकाजवळ स्मृतीचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. येथे देखील नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक राजेश वानखेडे, फिरोजखान हबीबुल्ला खान पठान, किशोर बेंडाळे, सिद्धार्थ बडगे, मुख्याधिकारी अमोल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

विवेकानंद स्कुल, निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अविनाश सोनार, भावेश कोळंबे, लकी जावा, पुष्कर भंगाळे, प्रणव खाचणे, मयुरी मोरे, देवयानी चौधरी, भाग्यश्री सोनवणे, सानिका पाटील, राजश्री भोगे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत म्हटले.

रावेरात तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण
रावेर शहरातील विविध शासकीय कार्यलयात ध्वजारोहण करण्यात आले. यापैकी मुख्य कार्यक्रम येथील तहसील कार्यालयात पार पडला. तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सामुहिकरित्या राष्ट्रगीताचे गायन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नगरसेवक सुधीर पाटील, माजी नगराध्यक्ष हरीषशेट गनवाणी, श्रीराम अग्रवाल, डॉ संदीप पाटील, डॉ.बी.बी.बारेला, डॉ.सुरेश पाटील, संदीप राजपूत,अशोक शिंदे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा अंजाळे
यावल तालुक्यातील अंजाळे येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद सदस्या नंदा सपकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावात स्वच्छता अभियानाची फेरी काढून शपथ घेण्यात आली. शाळेत बक्षीस वितरणानंतर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी शाळा अध्यक्ष नितीन सपकाळे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा सपकाळे, उषा सोनवणे, दीपाली सोनवणे, मनीषा सपकाळे, केंद्र प्रमुख सलीम तडवी, मुख्याध्यापक प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात बँडच्या तालावर गीतगायन
भुसावळ शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्थेच्या सचिव उषा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सोनू मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, झेंडागीत, हिंदी व संस्कृत समुहगीत बँडच्या तालावर सादर केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसह पालकांची उपस्थिती होती.

सावदा येथे ध्वजारोहण
शहरातील नगरपालिकेत नगराध्यक्षा अनिता येवले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. होमगार्ड, एनसीसी विद्यार्थ्यांनी ध्वजास सलामी दिली. सावदा पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आ.गं.हायस्कूलमध्ये मुख्याध्य्पक सी.सी. सपकाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. मंडळ अधिकारी तथा तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी शरीफ तडवी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी तलाठी के.के. तायडे व कर्मचारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी सी.एन.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अभियंता आर.जी.बाविस्कर शाखा, पांडव, चौधरी, व कर्मचारी उपस्थित होते. संभाजी चौकात देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याहस्ते भारत मातेचे पूजन झाले. यावेळी नगरसेवक राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, राजेंद्र चौधरी, किशोर बेंडाळे, नगरसेविका विजया जावळे, मंडळाचे अध्यक्ष गौरव वानखेडे, उपाध्यक्ष पवन तांबटकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.