विजयी विश्‍व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा!

0

जळगाव । 70व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमवारी सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी संस्थांकडून स्वतंत्र भारताचा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याची जाणीव मनात अधिकच अधोरेखित करणारा हा तिरंगा सूर्यास्तापर्यंत ठिकठिकाणी डौलाने फडकत होता. अनेकांच्या कपड्यांवर, गाड्यांच्या डॅशबोर्डवर, खिडक्यांच्या गजावरही तो दिमाखाने विराजमान झाला होता. तर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. सोमवारी अनेक ठिकाणी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. येणार्‍या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव या निमित्ताने करून दिली गेली. काही ठिकाणी कार रॅली, बाईक रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. ’भारतमाता की जय’ असे नारे देत झेंडे फडकवले जात होते. या निमित्ताने काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची भावना चेतवणारी समूहगीते सादर केली.

रायसोनीत माजी सैनिकांचा सत्कार
जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात परंपरेनुसार महाविद्यालयातील सर्व शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. यावेळी इलेक्ट्रिकल शाखेतील अंतिम वर्षात प्रथम आलेला सागर मिस्त्री या विद्यार्थ्याला हा मान देण्यात आला. तसेच 70 व्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने फ्लाईट लेफ्टनंट- विरेंद्रसिंग फौजदार, सिग्नल मेन- गोपाल तेली या दोन शूर विरांना सन्मानित करण्यात आले. यांनी कारगिल व पाकिस्तान युद्धात यशस्वी सहभाग घेतला हे विशेष आहे. महाविद्यालयाच्या सेमिनार सभागृहात हा कौतुक सोहळा दिमाखात पार पडला. प्रसंगी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, प्राचार्य प्रल्हाद खराटे आदी मान्यवर उपस्थित होते. अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना खूप उत्तम संधी सैन्यात आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग देश सेवेसाठी करावा. सैन्यात संकट कपाळाला बाशिंग बांधल्या सारखे असते. परंतु त्याचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे आपण पूर्णपणे सजग असतो आणि सजगतेने केलेले काम कधीच अपयशी ठरत नाही असा एकेरी सूर उपस्थित माजी सैनिकांनी आपले अनुभव व्यक्त करताना काढला. यातच शहीद जवानाच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी ‘कर चले हम फिदा, मेरा कर्मा तू मेरा धर्मा, रंगदे बसंती चोला, वंदेमातरम्’ हे देशभक्ती गीत व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलीत तसेच युदिष्ठीर पाटील तनिष लालवाणी व आखरीती सयानी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी सूत्रसंचालन रागिणी जोगी तर आभार उर्वशी शर्मा यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, चिटणीस मंदार कुलकणी, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, विशेष सरकारी वकील पद्मश्री ङ उज्वल निकम, यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, लहानमुले मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना जागेवर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जळगाव जिल्हा बँक
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा मध्य. सह बँकेच्या प्रांगणात जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हेमंत साळुंखे, बँकेचे सरव्यवस्थापक एम.टी. चौधरी, व्यवस्थापक पी.बी. सपकाळे, बँक युनियन प्रतिनिधी अनिल छोडू चौदरी, प्रदीप गरुड, राजेंद्र चव्हाण तसेच बँकेचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सै.नियाज अली भैय्या फाउंडेशन
सै. नियाजन अली भैय्या फाउंडेशनतर्फे हिंदू-मुस्लिम युवकांची राष्ट्रीय एकात्मता दुचाकी रॅली आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात सकाळी 9वाजता भिलपुरा येथील इमाम अहमदरजा चौकात शनिपेठचे पो.नि. सचिन बेंद्रे यांच्या हस्ते हिरवी झेेंडी दाखवून पुढे छापेकर चौक, टॉवर चौक, नेहरु चौक, कोर्ट चौक, येथून स्वातंत्र्य चौक येथे येऊन समाप्त झाली. या रॅलीचे नेतृत्व आयोजन अयाज अली नियाज अली यांनी केले. रॅलीत सामील युवकांनी झिंदाबाद झिंदाबा जश्‍न ऐ, यौ मे आझादी झिंदाबाद, हम सब एक है, ख्वॉजा का भारत झिंदाबाद मेरा भारत महान या सारख्या घोषणांनी शहर दणाणून सोडले. युवकांच्या हातात तिरंगा ध्वज होते. याप्रसंगी अयाज अली नियाज अली, पो.नि. सचिन बेंद्रे, हाजी युसुफ अली, पो.उ.नि. सपकाळे, सपोनि. धनराज शिंदे, राहुल चौधरी, तौसीफ रजवी, सुरज गुप्ता, ताज मोहंमद, हाजी वहाब शेख, मुकेश परदेशी, नजीम पेन्टर, रियाज अली, नरेश चव्हाण,मोहमंद खान, शफी मिस्त्री, सै. उमर शेख मुस्तकीम, डॉ. परीमल मुजुमदार, तपन महंतो, जुबेर रंगरेज, शेख मोबीन, सै. समीर, अमोल वाणी, योगेश पाटील, दानेश हुसेन अबरार शाह, शेख शाहीद यांच्यासह अनेक हिंदु मुस्लीमबांधव उपस्थित होते. आभार प्रदर्शन अयाज नियाज अली यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात स्वातंत्रदिनानिमित्त अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष गफ्फारभाई मलीक अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रीय ध्वजास सलामी व मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी क्रांतीकारक, देशभक्त व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करुन पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन यांनी स्वातंत्र्यलढ्याचे सिंहावलोकन करुन मार्गदर्शन केले आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी योगेश देसले, कल्पना पाटील, वाय.एस. महाजन, मंगला पाटील, अजित वाघ, वाल्मिक पाटील, अयाजभाई नियाजअली, मिनल पाटील, सलीम इनामदार, काशिनाथ इंगळे, प्रतिभा शिरसाठ, रोहन सोनवणे, लता मोरे, सचिन पाटील, अ‍ॅड. कुणाल पवार, अ‍ॅड. राजेश गोयर, लता मोरे, साविता बोरसे, रमेश पाटील, सविता बोरसे, मिला चौधरी, मनिषा देशमुख, गणेश नन्नवरे, अर्चना कदम, एस.एम. पाटील, जयप्रकाश चांगरे, राजेंद्र देसले,स्तिाराम पाटील, सिताराम धनगर, गणेश निंबाळकर, जयेश पाटील, राजु बाविस्कर, सुधाकर पाटील, अजयाभाई यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

इंडीयन रेडक्रॉस सोसायटी
इंडीयन रेडक्रॉस सोसायटी शाखेचे पदसिध्द अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या कन्या अनघा निंबाळकर ऐश्‍वर्या निंबाळकर उपस्थित होत्या. त्यात मानद सचिव विनोद बियाणी, चेअरमन रक्तपेढी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कोषाध्यक्षा सतीश चरखा, सह.सचिव राजेश यावलकर, सह. कोषाध्यक्ष घन:श्याम महाजन, चेअरमन, जेनेरीक समिती प्रा. शेखर सोनाळकर, पुष्पा भंडारी, डॉ. विजय चौदरी, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. प्रकाश जैन, डॉ. अनिल चौदरी, श्रध्दा महाजन, लक्ष्मण तिवारी, महेश सोनगीरे, उज्जवला वर्मा, अनुषी लुंड, प्रसन्न फुलफगर, डॉ. मदनलाल शिसोदिया, डॉ. अरविंद चौधरी, महेंद्र लुंकड, रिकेश गांधी, प्रा. सुधीरकुमार वाघुळदे, सैय्यद जाफर अली, सुरेंद्र सिंग, छाब्रा, विलास जोशी, देवादीस भडंगर, वैभव राणे, सुनील चौधरी, किरण बाविस्कर, रविंद्र जाधव, गोपाळ माळी आदी

गोदावरीत स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशभक्तीचा उत्साह
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी यंग इंंडीयाचे स्वप्न बघितले आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी युवापिढीवरच असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले. गोदावरी फाऊंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशभक्तीपर कार्यक्रमांचा उत्साह कायम होता. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8 वा. संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. रविंद्र पुराणिक, डॉ. डी.बी.पाटील, डॉ. एस.एम.पाटील, डॉ. माया आर्विकर, सुरेंद्र गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. उल्हास पाटील पुढे म्हणाले की, सध्याच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व आहे. नविन संशोधनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसीत करून देश सक्षम करण्यासाठी युवापिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर राष्ट्रनिर्माणाचे कार्य सामुहिकरित्या उभारले जाईल असेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

विविध शैक्षणिक संस्थांमध्येही स्वातंत्र्यदिन
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी सीबीएसई स्कुल, जळगाव, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ व सावदा, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील, कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, कला व विज्ञान महाविद्यालय, फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, गोदावरी संगीत महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपुरे, प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, उपप्राचार्य प्रविण फालक, स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, प्राचार्या अनघा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुक्ती फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबीर
स्वातंत्र्य दिन तसेच स्वच्छ भारत पंधरवाडानिमित्त सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन मी मराठी प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने शहरातील मेस्कोमाता परिसर ओम साई क्लिनीक येथे सकाळी 10 वाजता स्वच्छता अभियान उपक्रम डॉ. राजेंद्र पाटील सहकार्याने संस्थेचे कार्यकर्ते स्वयंभूरित्या स्वच्छचा अभियान राबवत यावेळी झाडूचे वाटप डासरोधक पावडरचेही वाटप करण्यात आले.

इकरा उर्दू हायस्कूल
इकरा शिक्षण संस्थेद्वारा संचलित इकरा उर्दू हायस्कूलमध्ये स्वातंत्र दिन ध्वजावंदन जश्रर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, शालेय, समितीचे सभापती प्रो.एस.एम. जफर, डॉ. ताहेर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी तील विद्यार्थीनी उर्दू, मराठी, इंग्रजी या भाषेत भाषणे, देशभक्ती गिते सादर केली. सदरहू विद्यार्थ्यांना जफर शेख यांच्या वतीने रोख बक्षिस देण्यात आले. पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अब्दुल करीम सालार यांनी नाविन्यपूर्ण शिक्षण प्राप्त करुन देशाच्या प्रगतीत आपण आपले योगदान कसे देवू या परीते प्रयत्नशील रहावे तसेच जातीयसलोख वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहावे, असे मोलाचा उपदेश त्यांनी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख बिलाल जावेद अन्सारी या विद्यार्थ्यांने केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख उपशिक्षक शाह रियाज अहमद, नासिर खान, जाकिर खान, जावेद शेख, सादिक शेख, उपशिक्षिका तबस्सूम शेख, नुसरत अफजा, सना मेहरीन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महावितरण परिमंडळात ध्वजारोहण
महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे मंगळवारी 70वा स्वातंत्र्यदिन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, अशोक साळुंखे, कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक जयेश हिवाळे, व्यवस्थापक रामचंद्र वैदकर, व्यवस्थापक उध्दव कडवे, उप.अभियंता नितीन पाटील, सहाय्यक अभियंता संजय वाघ, पंकज कांबळे, पीआरओ किशोर खोबरे, सिध्दार्थ लोखंडे, राजेश अहेर, उमाकांत विसपुते, रविंद्र चौधरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मधुसुदन सामुद्रे, दिपक कोळी, चरणदास देशमुख यांनी परिश्रम घेतले.

भंगाळे माध्यमिक विद्यालय
सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालय व जे.एस.शिंदे प्राथमिक विद्या मंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम रामदास भंगाळे यांच्या झाला. कार्यक्रमाचे संस्तेचे अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, सुहास बोरोले, पितांबर इंगळे, आटाळे काका हे उपस्थित होते. प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थी व गाईडच्या विद्यार्थिनींनी परेडमध्ये सहभाग घेऊन ध्वजाला सलामी दिली. खोटेनगर परिसरातून प्रभात फेरी झाली. शेवटी विद्यार्थ्यांनी चॉकलेट व बिस्किट वाटण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला माध्यमिक मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, विवेक नेहते, दिपक भारंबे, अनुपमा कोल्हे, दिपनंदा पाटील, सचिन महाजन, स्वाती पगारे, निखिल नेहेते, सुनिल गाजरे, विशाल सपकाळे, सारीका सरोदे, उत्कर्षा सोनवणे, निलिमा नेहेते, कोमल चौधरी, विजया नारखेडे, प्रशांत भारंबे,भूषण भोळे यांनी सहकार्य केले.