विजय आपलाच ; मतभेद विसरून कामाला लागा

0

रवींद्र भैय्या पाटील ; रावेरसह यावलमध्ये बैठक

रावेर/यावल- भाजपाच्या कारभाराला जनता वैतागली असून आगामी निवडणुकीत विजय आपलाच असून आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, वन बूथ टेन यूथ प्रमाणे कार्यकर्ते नेमा, असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी यावल व रावेर शहरात आयोजित बैठकीत केले. ते म्हणाले की, भाजपाचे सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. बोंडअळीसह पीक विम्याचे पैसे खात्यावर आलेच नाही तर कर्जमाफी बाबतही निव्वळ धूळफेक करण्यात आली आहे. खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकरी हवालदील झाला असून अशा प्रसंगी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, परिस्थिती बदलत असून आगामी निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा आशावादही त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना व्यक्त केला.

रावेरच्या बैठकीत यांची होती उपस्थिती
कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. माजी आमदार अरुण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, किसानसभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष गोटू शेट, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, युवक अध्यक्ष राजेंद्र चौधरी, समाधान सावळे, किशोर पाटील, राजू ठेकेदार, प्रवीण पाटील, सीताराम पाटील, मंदार पाटील, एल.डी.निकम, सोशल मीडिया अध्यक्ष राम शिंदे, मायाबाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधीन उपस्थित होते.

यावलमध्येही बैठक ; यांची होती उपस्थिती
यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक रवींद्र भैय्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नाना साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, गुणवंत नीळ, कुलदीप पाटील, सोशल मिडीया सेल जिल्हा उपसमन्वयक राजेश करांडे, शहर युवक अध्यक्ष विनोद पाटील, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष अतुल बडगुजर, आयटी सेलचे सीताराम पाटील, एम.बी.तडवी, नरेंद्र पाटील, निर्मल पाटील, राकेश सोनार, किशोर माळी, दीपक पाटील, नरेंद्र शिंदे, अनिल कोळी, दीपक येवले, निसार तडवी, शशिकांत पाटील, डी.के. पाटील, परेश साठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.