विजय खैरनार यांचे मार्गदर्शन

0

साक्री । कारखाना फाटा येथील छत्रपती अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी विजय आनंदराव खैरनार यांचे ’सैनिक व देश, ’आरोग्य, आहार, स्वच्छता,’आदी विषयावर समुपदेशन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन झाले. यावेळी प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक सेवानिवृत्त सैनिक धनराज देवरे यांनी केले. विजय खैरनार यांनी व्याख्यानातुन सैनिकांचे देश संरक्षणाचे महत्त्व विशद करताना विविध बाबींवर प्रकाश टाकला.

देशाचे भवितव्य तरुणांवर अवलंबून असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. जीवनात चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करून आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्याविषयी मार्गदर्शन करीत स्वछतेविषयी माहिती दिली. जिद्द चिकाटी मेहनत परिश्रम कष्ट करण्याची क्षमता निर्माण करा जीवनात यश हमखास मिळतो असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यशस्वीतेसाठी शिवाजी देवरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक निभा मोरे यांनी केले.