विजय गायकवाड यांची नियुक्ती

0

भडगाव । भडगाव तालुका भाजप अनुसूचित जमाती आघाडीच्या अध्यक्षपदी विजय वसंत गायकवाड, कजगाव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासोबत 4 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 4 चिटणीस सह अनुसूचित जमाती आघाडीची कार्यकारिणी भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी आज घोषीत केली.

कार्यकारी मंडळाची रचना
भाजप अनुसूचित जमाती आघाडीच्या उपाध्यक्षपदी कैलास सोनवणे (गिरड), संजय भिल (सावदे), नाना सहादु भिल (पिचर्डे), अशोक भिल (पिंपरखेड), सरचिटणीस देविदास सदाशिव भिल (पळासखेडे), विनोद हरचंद सोनवणे (भडगाव), चिटणीस किशोर भिल (भडगाव), जितेंद्र नामदेव मोरे (पिंप्रिहाट), दादाभाऊ शंकर भिल (देव्हारी), भगवान कृष्णा गोकुळ (खेडगाव) तर सदस्यपदी रघुनाथ लुका सोनवणे (उमरखेड) व भावडू रविंद्र बागुल (गुढे) यांची नियुक्ती करून भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी ही कार्यकारिणी घोषीत केली. या नियुक्तीबद्दल कार्यकारी सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.