विजय, जयश्री यांना बेस्ट एक्सलन्स पुरस्कार

0

जळगाव । स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धेत के.सी.ई. सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विजय बारी, जयश्री बारी या दोन विद्यार्थ्यांना बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड पटकाविला. या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड ब्रॉड कास्टींग गर्व्हमेंट ऑफ इंडिया व नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.सी.ई सोसायटीच्या ओजस्विनी महाविद्यालयाचे विद्यार्थी विजय.के.बारी व जयश्री.एल.बारी या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात विजय बारी यांनी खुद बदलो भारत बदलेगा आणि जयश्री हिने स्वच्छता कि ओर एक कदम या विषयावर शॉर्ट फिल्म बनवून सादर केली होती. शॉर्ट फिल्म उत्कृष्ठ ठरल्याने विजय बारी, जयश्री बारी या विद्यार्थ्यांना बेस्ट एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.