विजय मल्ल्याची कोहलीच्या कार्यक्रमात हजेरी !

0

लंडन । भारत-पाकिस्तान रविवारी झाला.या सामन्याला भारताच्या बँकेच्या हजारो कोटी बुडवून फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने उपस्थिती दिली. या खळबळीनंतर मल्ल्याने दुसरी खळबळी उडवली ती मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणार्‍या जस्टिस अँड केअर या संघटनेतर्फे रविवारी लंडनच्या एसएसी मैदानात विराट कोहलीच्या उपस्थितीत एका चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मल्ल्या अचानक उपस्थित राहिले.त्याची उपस्थिती पाहून भारतीय खेळाडूंची अक्षरश: पळापळ झाली. भारतीय खेळाडूंनी विनाकारण कोणताही वाद ओढवू नये म्हणून कार्यक्रम संपण्याआधीच सर्व खेळाडूंनी तिथुन काढता पाय घेतला. या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.

न्यायालयाने व सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) वारंवार समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहण्याचे टाळल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आलेय. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार ब्रिटन सरकारशी वाटाघाटी करतेय. अशातच रविवारी त्याने सामना पाहण्यासाठी हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, त्याची पर्वा न करता दुसर्‍याच दिवशी मल्ल्या कोहलीच्या ’चॅरिटी डिनर’ कार्यक्रमात अवतरला.’मल्ल्याच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाचे खेळाडू गांगरून गेले होते. प्रत्येकजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता’, असं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका उच्चपदस्थ पदाधिकार्‍याने सांगितले.’विराट किंवा त्याच्या संस्थेनं मल्ल्याला त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते. कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणीतरी त्याला बोलावलेले असावे. खेळाडूंसाठी तो मोठाच पेचप्रसंग होता. मल्ल्याने तिथून जावे असा त्याला सांगता येत नव्हते. त्यामुळे विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनीच तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,’ असंही या पदाधिकार्‍यानं सांगितले.