विजय माल्याच्या अटकेसाठी सीबीआय टीम लंडनमध्ये

0

नवी दिल्ली । विजय मल्ल्याची लवकरच भारतात हजेरी लागणार आहे. भारतीय बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार पळालेल्या माल्याला चतर्भूज करण्यासाठी सीबीआयची एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. या टीमचे नेतृत्व सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना करत आहेत. अस्थाना यांच्यासोबत अंमलबजावणी संचलनालयाचे काही अधिकारीही लंडनमध्ये दाखल झाले आहेत.

या प्रकरणात विजय माल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटकही केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. भारताच्या अपीलवर माल्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये विजय माल्याच्या मुद्द्यावर करारही झाला होता. आता ते प्रकरण तिथल्या स्थानिक कोर्टात आहे. माल्याच्या अटकेनंतर ब्रिटिश कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी भारतातून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांसह एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. विजय माल्या स्वतःच्या प्रत्यार्पणाला आव्हानही देऊ शकतो. माल्या प्रत्यार्पणाला राजकारणाच्या दृष्टीने अटक करत असल्याचा आरोप करत त्याला विरोधही करू शकतात. स्वतःच्या प्रत्यार्पणाला माल्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा स्पष्ट करण्याचाही प्रयत्न करू शकतो.