मुंबई: कॉंग्रेस नेते कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार हे त्यांना मिळालेल्या खात्यावरून नाराज आहेत. म्हणूनच त्यांनी आजपर्यंत पदभार स्वीकारलेला नाही. खात्यासोबातच ते त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यावरून नाराज होते. दरम्यान त्यांची मनधरणी करण्यात आली असून त्यांना बंगला बदलून देण्यात आले आहे. त्यांना बी-१ हा बंगला बहाल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा बंगला होता. आता जितेंद्र आव्हाड यांना बी-५ बंगला देण्यात येणार आहे.
बंगला बदलून देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. मात्र त्यांची नाराजी दूर होईल का हे येत्या काळात कळेल.