विजवितरणचा अनागोंदी कारभार; रोहीत्र खुल्यावर

0

चाळीसगाव । शहरातील स्टेशन रोड वरील आस्था मेडीकल समोर विज वितरण कंपनीचे रोहित्र (डिपी)चे फाळके उघडे असल्याने रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनाचे संतुलन बिघडल्यास तेथे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी असे शहरात अनेक ठिकाणी रोहित्रांचे फाळके उघडे असलेल्या ना फाळके बंद करून कुलूप लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आता नागरिकांमधुन जोर धरु लागली आहे.