मंदीराला रंगकाम करतांना झाली घटना
धुळे । शहरातील विजेचा शॉक लागून दोन रंग काम करणार्या मजुरांचा मृत्यु तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली. चितोड रोडवरील रंगारी चाळ येथील मंदिराला रंग देत असताना उच्च दाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून गोरख पांडुरंग बोरसे (२५) आणि बादल नामदेव मोरे (१९) दोघे राहणार जमनागिरी रोड, धुळे या दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. रंगारी चाळीजवळ चिंचणी मायाक्का मंदिराला नवरात्रीनिमित्त रंग देण्याचे काम सुरू होत़े दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मंदिराला रंग देत असताना मंदिरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला रंग देणा-या तरुणांचा स्पर्श झाला़
महावितरण अभियांताकडून सात्वन
या घटनेत गोरख पांडुरंग बोरसे (वय २५) आणि बादल नामदेव मोरे (वय १९) दोघे रा़ जमनागिरी रोड, धुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर नितीन (मेजर) हे जखमी झाल़े या घटनेनंतर लागलीच वीजपुरवठा खंडित करून तरुणांना रुग्णालयात नेण्यात आल़े त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आल़े या घटनेनंतर संबंधित तरुणांचे नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे गाठून आर्थिक मदत देण्याची मागणी केली़ त्यानुसार महावितरणचे शहर अभियंता किसन पावरा यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन नातेवाईकांचे सांत्वन केल़े तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये मदत देणार असल्याचे सांगितले.