मुळशी । गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेला पावसामुळे मुळशी तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत. हा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पिरंगुट, लवळे, भूगाव, भुकुम, कासारआंबोली, भरे, उरावडे, घोटावडे, अंबडवेट, शिंदेवाडी, सुतारवाडी या गावांसह परिसरातील वाड्या-वस्ती येथे विजेचे अधूनमधून गायब होणे सुरूच आहे. पिरंगुट गाव हे मुळशीमधील औद्योगिक वसाहतीची पंढरी आहे. या गाव परिसरात अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. तसेच बहुतांशी सर्व कारखाने हे येथील विजेवर अवलंबून आहेत. त्यामुळे सतत सुरू असलेला लपंडावामुळे मोठा आर्थिकफटका बसत आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.