धुळे। तालुक्यातील मालपुर गावात आज दुपारी विहीर खोदण्याचे काम सुरू असतांना विजेचा शॉक एकाचा मृत्यू झाला. सत्तु राजुजी बेरवा वय22 रा.भिलवाढा राजस्थान हा विहीर खोदत असतांना त्याला विजेचा शॉक लागला. त्यास साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ श्रीकांत पाटील यांनी तपासून मयत घोषित केले.
याबाबत पोलीस स्टेशन ला केतन फकीरराव बोरसे यांनी खबर दिली आहे. केतन फकीरराव बोरसे यांच्या शेतात विहीर खोदकाम सुरु आहे. विहिरीत साठलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जलपरी सुरू केली. जलपरीचा शाँक लागल्यामुळे सत्तु बेरवा याला विहीर बाहेर काढून त्याला उपचारासाठी घेऊन येत असतांना मयत झाल्याची घटना घडली आहे.