विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्याने ९ गायींचा मृत्यू

0

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील कनोली येथे विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्याने ९ गायींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे ऐन दुष्काळात नानासाहेब ठकाजी वर्पे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी नानासाहेब वर्पे यांनी घराजवळील गोठ्यात गायी बांधल्या होत्या. पण गोठ्याजवळुन गेलेली विजेची मुख्य तार अचानक तुटून पडल्याने ९ गायींचा मृत्यू झाला. ऐन दुष्काळात ९ गायींचा मृत्यू झाल्याने वर्पे कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलं आहे. तसंच महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणा केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.