विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

0

पिंपरी : मशिनवर काम करताना विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. कुदळवाडी-चिली येथील एस.एम. प्लॅस्टिकमध्ये 17 डिसेंबरला ही घटना घडली. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शंकरलाल भागाराम जाट (वय 48, रा. आपुलकी सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) असे संशयित कंपनी मालकाचे नाव आहे, तर क मलेशकुमार बसंतलाल चौहान (वय 25, रा. चिंचवड) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत क मलेश याला मशिन चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना जाट यांनी त्याला मशिन चालवण्यास दिली. तसेच त्याचे जीविताचे व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना न करता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे कमलेश यास विजेचा धक्का लागून त्यात त्याचा मृत्यू झाला.