चाकण : भोसे ( ता.खेड ) येथे घरामध्ये लाईटचे बटन चालू करताना शॉक बसून युवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि.6 ) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र चंद्रकांत कुटे ( वय 30, रा. भोसे, ता.खेड, जि.पुणे ) असे मयत झालेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. याबाबतची खबर संतोष शांताराम कुटे यांनी दिली. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.