विजेच्या धक्याने डंपरच्या क्लिनरचा मृत्यू

0

चाळीसगाव। शहरातील लक्ष्मी नगर मध्ये डंपर ला विजेच्या तारांचा अडथळा होत असल्याने डंपर वरील क्लीनर गोविंदा दिलीप सोनवणे (22) रा पाटणादेवी रोड चाळीसगाव हा वरील विजेच्या तारा काठीच्या साहाय्याने बाजूला करीत असतांना विजेच्या प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे.

त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता तो मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एस.पी. गवळी करीत आहेत.