विजेच्या शॉकने महिला भाजली

0

जळगाव | घरात काम करीत असतांना विजेचा शॉक लागून महिला भाजल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहे. याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सुजदे भोलाणे येथील साधना सुकदेव कोळी (वय-३०) ही महिला घरात काम करीत होती. दरम्यान या महिलेला काम करीत असतांना घरात विजेचा शॉक लागून ही महिला भाजली गेली. महिला भाजल्याचे तीच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच तीच्या कुटूंबियांनी तात्काळ त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.