मुंबई: मराठी रसिकांच्या पसंतीस उतरलेला बिग बॉसच्या शोमध्ये सध्या धमाल सुरु आहे. बिग बॉसच्या अंतिम विजेता कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. आता चार आठवड्यांचाच खेळ शिल्लक आहे. दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या विजेत्यांच्या यादीतील एक मोठा स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. हे चाहत्यांसाठी आश्चर्यकारक आहे. अभिजीत केळकर एलिमिनेट झाला आहे. महेश मांजरेकर यांनी किशोरी शहाणे आणि अभिजीत केळकर या दोघांपैकी किशोरी सुरक्षित असून अभिजीत घराबाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे.
या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणा एका सदस्याला घर सोडून जावे लागणार होते. आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे घरातील या तीन तगडे सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे डेंजर झोनमध्ये आले होते आणि अभिजीत केळकरला या आठवड्यामध्ये घर सोडून जावे लागले.