विज्ञानाच्या पेपराला कॉपी करणारे जळगावातील पाच विद्यार्थी डीबार

0
जळगाव:– दहावी परीक्षेतील विज्ञानाच्या पेपर दोन विषयाला कॉपी करताना जळगाव शहरातील पाच विद्यार्थ्यांना डाएटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी डीबार केले. डीबार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नूतन मराठा माध्यमिक विद्यालयातील एक तर अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तीन तसेच आर.आर.हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.