भुसावळ । जगात व भारतात शांती व सद्भावनेची गरज आहे. देशात वाढलेले गुन्हे, दरोडे, भ्रष्टाचार लक्षात घेता यात सुशिक्षीत लोकांचा अधिक हात असल्याचे दिसून येते. त्यामुळे शैक्षणिक संस्था आदर्श, समाजशील विद्यार्थी घडविण्याच्या आपल्या उद्देशात यशस्वी होत नसल्याचे दिसून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानासोबत चारित्र्य संगोपनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्टुडंट इस्लामिक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. सुहेल आमीर शेख यांनी केले.
‘मानवीय सन्मान’ विषयावर विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
राष्ट्रीय मानवीय सन्मान अभियांनातर्गंत एसआयओद्वारा पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातील भुगोल विभागात ‘मानवीय सन्मान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रा. सुहेल आमीर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. लढे यांनी केले. प्रसंगी प्रा. शेख यांनी माणासाला ईश्वराने जन्मत: सन्मान दिला. अधिकार दिले. मात्र त्याचा गैरवापर केल्याने अपराधीक कार्य करणे हे ईश्वराच्या आदार्शा विरुध्द आहे. युवकांनी भारताच्या प्रगतीसाठी पुढे यायला पाहिजे. समानतेवर आधारीत समाज निर्मिती करण्यास योगदान दिले पाहिजे. आभार मोहम्मद शोएब यांनी केले. कार्यक्रमास प्रा. विनोद कोचुरे, अध्यक्ष कफिन अहमद उपस्थित होते.